Saturday, April 1, 2017

Books which influenced me - 2. "Panipat"

"दोन मोती गलत, दस बीस अश्राफत् , रुपयोंकी गिनती नहीं"।
मला वाटत नाही मराठा साम्राज्यावर पानिपतच्या युध्दाचा impact  याहून जास्त चांगल्या प्रकारे describe आला असता. मी इतिहास तज्ज्ञ अथवा संशोधक नाही म्हणून त्यावर काही comment करण्याचे टाळून एक वाचक व इतिहासप्रेमी म्हणून विश्वास पाटील यांच्या पानिपत कादंबरीने माझ्यावर केलेल्या प्रभावाविषयी लिहिण्याचा हा एक छोटेखानी प्रयत्न.
मी शाळेत सुदधा पानिपत फक्त एका paragraph मध्ये वाचलेलं, आमचा विश्वास पानिपतात गेला आणि भाऊ हा अजिबात चांगला सेनापती नव्हता हे डोळे झाकून मान्य केलेलं असल्याने या कादंबरीविषयी माझा फारसा चांगल मत नव्हत. शुजा आणि मीर जाफर यांच्यातील शह- काटशह आणि रॉबर्ट कॅलिव्हचे डावपेच हे वाचून अरे रे किती वाईट झालं म्हणून सुस्कारे टाकले आणि कायम विचार केला इंग्रज प्लासी हरले असते तर आपण गुलाम झालो नसतो. पण इतिहासाच्या पुस्तकात कधीही अन्न पाण्याशिवाय लढलेले मराठे सांगितले गेले नाहीत ना कधी हे सांगितलं गेलं की मराठ्यांच्या पानिपताच्य पराभवाचे दूरगामी परिणाम हे प्लासीच्या लढाईपेक्षा जास्त होते.
इसवी सन1761, प्लासीच्या लढाईच्या 4 वर्षांनंतर मराठेशाही आणि अफगाण शाह "अहमदशाह अब्दाली" यांच्यातील घनघोर रणकंदन म्हणजे पानिपत. जीवाचं रान अन छातीचा कोट करून अफगाणाच्या बंदुका आणि तोफांना सामोरा गेलेल्या मराठ्यांच्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच प्रतीक म्हणजे पानिपत. एका दिवसात आपला भावी पेशवा आणि सरसेनापती गमावलेल युद्ध म्हणजे पानिपत. एवढं सगळं असूनही कायम भारतीय इतिहासतील सर्वात दुर्लक्षित युद्ध म्हणजे पानिपत. अन या सगळ्याविषयी सविस्तरपणे बोलते ती विश्वास पाटलांची कादंबरी पानिपत.
मी पानिपत पहिल्यांदा वाचली ती 11-12 च्या दरम्यान पण तेंव्हा ना भाषा समजण्यासाठी लागणारी maturiy होती ना सदाशिवभाऊंचा मोठेपणा पटवून देण्याची समज. पण हल्ली म्हणजे एक दोन वर्षांपूर्वी मी पानिपत पुन्हा वाचली आणि खरंच सुन्न झालो.
अटकेपार जरीपटका लावणारे राघोबादादा नजीब खान रोहिल्याला मल्हारराव होळकरांच्या विनंतिला मान देऊन सोडून देतात आणि तिथून खऱ्या अर्थाने पानिपतच्या युध्दाचि बीजं रोवली जातात. मराठा साम्राज्याचा कोहिनुर दत्ताजी शिंदे नजीबाच्या खेळीची पहिली शिकार होतात. बचेंगे तो औरभी लडेंगे म्हणत दत्ताबा हसत हसत मृत्यूला सामोरं गेले आणि मराठी साम्राज्य हादरले. त्या नरावीरच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी उभी मराठेशाही पेटून उठली. हे सगळे प्रसंग विश्वास पाटलांनी अप्रतिमरित्या अधोरेखित केले आहेत. पानिपत कादंबरीतील भाषा आणि योग्य शब्दांचा वापर हे सगळे प्रसंग जसेच्या तसे आपल्या समोर उभे करतात.
मराठी किंवा एकूणच इतिहासकारांनी सदाशिवराव भाऊंना पानिपतच्या पराभवासाठी जबाबदार ठरवून टाकले आहे पण पानिपत भाऊंच्या व्यक्तीमत्वाला पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर आणते. गोविंदपंताना वारंवार खलिता धाडून मदत मागणारे भाऊ अगदीच अगतिक वाटतात पण तेच भाऊ जुन्या सरदारांचा विरोध पत्करून इब्राहिमखानच्या तोफखान्यावर निःसंकोचपणे विश्वास ठेवतात. आणि इब्राहिमखान देखील शेवटपर्यंत आपल्या धन्यासोबत लढून त्यांचा विश्वास सार्थ ठरवतात.
पानिपतचा सगळ्यात मोठ बलस्थान म्हणजे यातल्या सगळ्या महत्वाच्या व्यक्तीरेखा आहेत. भाऊ, समशेर बहादूर, नजीब, इब्राहिमखान, जनकोजी आणि दस्तरखुद्द अब्दाली यांची पात्र ज्याप्रकारे लिहिली गेली आहेत त्याला तोड नाही.
पानिपत आपल्याला त्या काळात घेऊन जाते आणि या युध्दाचे महत्व पटवून देते. भाऊंची अवहेलना कमी करवून त्यांना त्यांचे due credit देणारी पानिपत कादंबरी इतिहासप्रेमींसाठी पर्वणी आहे. भाऊ इतर इतिहासकारांनी रेखाटल्याप्रमाणे वेडे नसून एक महान योद्धा आणि कुशल सेनापती होते याची प्रचीती एक वाचक म्हणून आपल्याला येते.
विश्वासराव अकाली गेले आणि भाऊ सरसेनापती म्हणून अपयशी ठरले हा समज घेऊन जगणारा मी हे पुस्तक वाचून संपलं तेव्हा या दोन वीरांसमोर नतमस्तक झालो.

No comments:

Post a Comment